Saturday, November 27, 2021

नगर जिल्ह्यातील या आमदारांने केली चिंता व्यक्त चौथ्या दिवशीच रुग्णाची परिस्थिती गंभीर होत आहे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :आमदार रोहित पवार यांनी काल नगर शहरात आले होते. येथील कोविड रुग्णालयांना त्यांनी भेटी दिल्या. जिल्हा सरकारी रुग्णालयात जाऊन तेथील ऑक्सीजन आणि औषधांच्या उलब्धतेची माहिती घेतली. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशीही त्यांनी संवाद साधला.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले.करोना व्हायरस आता बदलला आहे. वास्तविक पहाता दर पंधरा दिवसाला राज्यांतून नमुने घेऊन या बदलांवर लक्ष ठेवणे अपेक्षित होते. मात्र, हे काम आपल्या देशात झालेले नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे,’

असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सध्याच्या परिस्थितीत पक्षीय राजकारण नव्हे तर माणुसकीच्या भावनेने सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे आपल्याला वाटत असल्याचेही ते म्हणाले.करोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास केंद्र सरकार कमी पडले हे सांगताना पवार म्हणाले,

‘सध्या जो करोनाचा व्हायरस आहे, तो बदलतो आहे. पूर्वी आठ दहा दिवसांत फारसा परिमाण होत नव्हता. आता चौथ्या दिवशीच रुग्णाची परिस्थिती गंभीर होत आहे. करोनाच्या या बदलावर केंद्र सरकारने लक्ष ठेवायला हवे होते. नियमितपणे नमूने घेऊन त्यांची तपासणी करून नोंदी ठेवल्या असत्या तर

हे बदल लक्षात येऊन त्या दिशेने उपाययोजना करता आल्या असत्या. हे काम आपल्या देशात झालेले नाही. पक्षीय राजकारण सोडून सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीचा मुकाबला करण्यची गरज आहे,’ असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!