Wednesday, December 8, 2021

नगर जिल्हा रुग्णालयात आता मिळणार नैसर्गिक ऑक्सिजन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यासाठी दररोज चार टँकर ऑक्सिजनची गरज असताना सध्या फक्त दोन ते तीन टँकर येत आहेत. ऑक्सिजन पूर्ण क्षमतेने मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हवेतील ऑक्सिजन रूग्णांना देण्यासाठीची यंत्रणा जिल्हा रूग्णालयात बसविण्यात आली आहे. पुढील तीन दिवसात हा प्रयोग सुरू होणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांना दिली.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, रूग्णांना ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता आहे.

जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी पालकमंत्री, प्रशासन लक्ष ठेवून आहेत. जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, खासगी रूग्णालयांना सध्या ५० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. याचे नियोजन योग्य पद्धतीने होण्यासाठी प्रशासन, शासन लक्ष ठेवून आहे.

जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ण क्षमतेने व्हावा, यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांची बैठक झाली. जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री कार्यालय यांच्यात सातत्याने ऑक्सिजनचा

पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या ऑक्सिजनची कमतरता भासत असून, तो पुरवठा कसा सुरळीत होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!