नेवासा 3 में : राहुल कोळसे:शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती करावी त्यांनी राजकारणात येऊन राजकारण करू नये आणि जरी राजकारणात आले तर त्यांना यशस्वी होऊन द्यायचे नाही ही राज्यकर्त्यांची इच्छा असते. शेतकऱ्यांनी मरेपर्यंत फक्त कष्ट आणि शेतीच करावी असे
काही लोकांना वाटते पण हेच वाक्य एका 27 वर्षाच्या शेतकऱ्याच्या मुलांना खोटं ठरवलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथील शेतकरी पुत्र शरद मरकड हा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा स्वीय सहाय्यक बनला आहे.
अतिशय गरीब कुटुंबात शरद मरकड यांचा जन्म झाला. खडतर आणि गरीब कुटुंबातून त्याचा प्रवास सुरू झाला वयाच्या सोळाव्या वर्षापासून त्याला शेतकरी चळवळीत काम करण्याची आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची आवड होती. एकीकडे शेतकऱ्यांचे हाल व दुसरीकडे
स्वतःचे शिक्षण सुरू असताना त्यानेही शेतकऱ्यांसाठी काम करण्याची ठरवले आणि शेतकरी संघटनेबरोबर काम सुरू केले अगदी प्रामाणिकपणे तसेच संघर्ष करत शेतकऱ्यांना त्यांनी अनेक आंदोलन उपोषण करून न्याय दिला.2018 साली राज्यात दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळात शरद मरकड
याने पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येते विनाअनुदानित चारा छावणी सुरू करून शेतकऱ्यांच्या पशुधन वाचवले होते.या चारा छावणीकडे महाराष्ट्रातील अनेक राजकारण्यांचे लक्ष गेलं. अनेक राजकारण्यांनी त्या चारा छावणीला भेट दिली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात
शेतकरी आंदोलन सुरू होते.त्या आंदोलनात शेतकऱ्यांना संघटित करून शरद मरकड यांनी दिल्ली येथे आंदोलनात सहभाग घेतला होता.शेतकरी हाच माझा पक्ष हेच धोरण ठरवत शेतकऱ्यांना नेहमी मदत करण्याचे शरद मरकड यांचा ध्यास आहे. शरद मरकड यांच्या शेतकरी विषयी असलेली तळमळ व कष्ट करण्याची
तयारी याची दखल खुद्द तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी घेतली व शरद मरकड यांना बोलून घेत त्यांची मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे स्वीय सहाय्यक म्हणून नेमणूक केली आणि भारत राष्ट्र समितीमध्ये काम करण्याचे शरद मरकड यांनी ठरवलं. त्यांना महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माणिकदादा कदम, दशरथ सावंत,
महाराष्ट्र प्रभारी आमदार जीवन रेड्डी, नाना बच्छाव, सोमनाथ थोरात, बाळासाहेब देशमुख, पवन करवर यांची चांगली साथ लाभली आहे. शेतकऱ्यांचा मुलगा जर एवढ्या मोठ्या पदापर्यंत जात असेल तर निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे म्हणूनच शेतकऱ्यांच्या पुत्रांनी कुठेही मागे आणि संकोच न करता काम केलं तर यश निश्चित मिळेल.
मुख्य वैशिष्ट्य:1) चांगल्या पगाराची नोकरी सोडून मुख्यमंत्री के सी आर यांच्याबरोबर काम करणार
2) 2018 साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला जनावरांसाठी शरद मरकड महाराष्ट्रातील पहिली विनाअनुदानित चारा छावणी सुरू केली
3) गावापासून दिल्लीपर्यंत शेतकऱ्यांसाठी आंदोलन
4) कोरोना काळातही नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत
5) संगणक शास्त्रात पदवीधर तरी लहान वयापासून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काम
6) देशभरात लंपी आजाराने थैमान घातले असताना देशातील पहिले क्वारंटाईन सेंटर सुरू केले.
7)शरद मरकड गेल्या ५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रत्येक लढ्यासाठी अधिकाऱ्यांना विनंती करण्यासाठी सतत सायकलवरून प्रवास