Friday, December 3, 2021

संतापजनक: खासदार लोखंडे पुढे करोनाने मरण्यापेक्षा तुमच्या मदतीच्या विषाने मेलेले बरे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :कोपरगाव तालुक्यात करोनामुळे मृत्युचे प्रमाण वाढले आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने रूग्णांना व नातेवायीकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय.शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांना जिवघेण्या संकटाच्या या काळात नागरीकांनी

साधी रुग्णवाहिका मागितली तरी त्यांनी वर्षभरापासून दिली नाही. सध्या करोनाने उद्रेक केला. उपचार घेण्यासाठी बेड उपलब्ध नाहीत,ऑक्सिजन चा पुरवठा अपुरा पडतोय, उपचारा अभावी माणसांचा मृत्यु होत असल्याने वैतागलेल्या

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी कृष्णाई मंगल कार्यालयाच्या बाहेर खासदार सदाशिव लोखंडे यांना घेराव घालुन मदत करण्याची विनंती केली.खासदार यांनी उडवाउडवीचे उत्तर देताच मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष संतोष

गंगवाल यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांनी खासदार लोखंडे यांचे खाली वाकुन पाय धरत म्हणाले की, साहेब उपचारा अभावी कोपरगावचे नागरीक मरत आहेत त्यांना जाळण्यासाठी किमान लाकडे तरी द्या. आता अंतिमसंस्कार करण्यासाठी लाकडांची कमतरता भासु लागली आहे.

नागरीकांना करोनातुन वाचविण्यासाठी जरी तुम्ही मदत करीत नसाल तरी किमान जाळण्याकरीता लाकडांची मदत करा अन्यथा आम्हाला विष तरी द्या म्हणजे करोनाने बेहाल होवून मरण्यापेक्षा तुमच्या मदतीच्या विषाने मेलेले बरे अशी

मागणी मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड व दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल यांनी करताच खासदार लोखंडे आवाक झाले.याच दरम्यान माजी आमदार स्नेहलता कोल्हे आल्या त्यांनीही खासदार लोखंडे यांच्याकडे आपल्या

व्यथा मांडून नागरीकांना या संकटकाळात आरोग्यहितासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. व्याकुळतेने मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीने उपस्थित सर्वजन गोंधळून गेले.

दरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोपरगाव येथे करोना आढावा बैठक घेतली या बैठकीला खासदार लोखंडे आले होते. बैठक संपल्या नंतर ते बाहेर आल्यानंतर मनसेच्या कार्यकत्यांनी आपली कैफियत लोखंडे यांच्यासमोर मांडले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!