Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यातील या युवक नेत्यांचा सवाल भाजपच्या कार्यकर्त्यांकडे ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शन आले कोठून ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम:‘जेथे सर्वसामान्य लोकांना रेमडेसिविरचे एक इंजेक्शन मिळविण्यासाठी नाकीनऊ येतात, तेथेच भाजपच्या कार्यकर्त्यांकडे पन्नास हजार इंजेक्शन येतात कोठून?’ असा सवाल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला.

रेमडेसिविरच्या साठ हजार इंजेक्शनचा साठा लपवून ठेवलेल्या एका कंपनीच्या मालकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले. तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर त्याच्या सुटकेसाठी पोलिस स्टेशनला धावत आहे. ही इंजेक्शन त्यांनी राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना

देण्यासाठी ठेवली होती. हे इंजेक्शन राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना देण्यासाठी कंपनीच्या मालकावर दबाव आणला जात होता. हे पोलिसांना कळाल्यावर पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आल्यावर भाजपचे नेते सुटकेसाठी तेथे धावत आले.

करोनाचा वाढता उद्रेक आणि रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसतर्फे ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तांबे बोलत होते.

जेथे सामान्य माणसाला एक इंजेक्शन मिळणे अवघड आहे, अशा वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडे पन्नास हजार इंजेक्शन येतात कशी? हे अतिशय खालच्या पातळीवरील राजकारण असून त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. करोना काळातील रक्ताची गरज भागविण्यासाठी युवक

काँग्रेसतर्फे ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. नागरिकांनी त्यामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे,’ असे आवाहनही तांबे यांनी केले.

ताज्या बातम्या

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना हे देणार बांगड्यांचा आहेर ?

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे 2010 पासून 32 कोटी रुपये, बनावट सोनेतारणचे 6 कोटी रुपये तसेच शासनाच्या वर्ग-2 जमिनीवरती नऊ कोटी रुपये...

नगर जिल्ह्यात या ठिकाणी गावरान कांद्याला विक्रमी भाव…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले.गावरान कांद्याची सुमारे 17 हजार 715 कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याला 3000 ते 3300 रुपयांचा...
error: Content is protected !!