Saturday, November 27, 2021

या आमदारांमुळे जनतेला संकटात धीर मिळतोय अण्णा हजारे यांनी केले तोंडभरून कौतुक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :कोरोनाच्या संकट काळात जनतेला धीर व आधार देण्याचे काम आमदार निलेश लंके हे करीत आहेत. मागील वर्षीही आणि आताही कोरोना काळात त्यांनी चांगले काम केले अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आमदार लंके यांचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमोर कौतुक केले.

महसूलमंत्री थोरात यांनी नुकतीच राळेगणसिद्धी येथे श्री.हजारे यांची भेट घेतली. त्यांनी अण्णांच्या तब्येतीची चौकशी करीत, काळजी घेण्याची विनंती केली.

मंत्री  बाळासाहेब थोरात म्हणाले, “रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा राज्याला कमी पडू देणार नाही. सर्व कंपन्यांनी औषधांची उत्पादनक्षमता वाढविली आहे. लवकरच इंजेक्शन उपलब्ध होतील.

राज्यात यापुढे रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा तुटवडा पडू देणार नसल्याचे सांगतानाच रेमडेसिविर इंजेक्शन तयार झाल्यानंतर पंधरा दिवसांनी ते उपचारासाठी वापरता येते. पुढील तीन-चार दिवसांत पंधरा दिवसांचा कालावधी संपणार असून, राज्याला यापुढे मुबलक प्रमाणात या इंजेक्शनचा पुरवठा होईल असेही महसूलमंत्री थोरात यांनी सांगितले.

यावेळी आमदार निलेश लंके, आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, पोलिस निरीक्षक घनश्याम बळप,माजी सरपंच जयसिंग मापारी, लाभेश औटी, उद्योजक सुरेश पठारे, आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!