मुंबई
शिंदे गटाच्या शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांनी पुन्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे.शितल म्हात्रे यांनी ट्विट करून उद्धव ठाकरेंची खुर्ची पुन्हा एकदा गेली असा चिमटा काढला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी माझी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इतर नेत्यांसोबत सोफ्यावर बसल्याचे चित्र ट्विट करत शितल मात्रे म्हणाल्या,महाभकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे अन्य दोन नेत्यांसोबत सोफ्यावर बसले होते. यापूर्वी त्यांना वेगळी खुर्ची असायची. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ती सुद्धा गेली.