Sunday, June 4, 2023

बी आरएस पार्टीचे नांदेडला 19 व 20 मे रोजी कार्यशाळा व चर्चासत्र  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव करणार मार्गदर्शन 

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे नेवासा:महाराष्ट्रातील नांदेड व औरंगाबाद येथील सभा महाराष्ट्रातील सभा यशस्वी पार पडल्यानंतर पुढील राजकीय वाटचालीसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 2 मे रोजी हैदराबाद येथे झालेल्या

प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकीमध्ये महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात विधानसभा निवडणुका लढविण्याचे जाहीर केले.त्यानुसार प्रत्येक मतदारसंघातून प्रचार यात्रा फिरण्यासाठी कार्यकर्त्यांची कार्यशाळा व पुढील नियोजनाचे चर्चासत्र 19 व 20 मे रोजी नांदेडला होत आहे.

या कार्यशाळेला बीआर एस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव करणार मार्गदर्शन करणार आहे.या बैठकीचे नियोजन महाराष्ट्र संपर्क प्रमुख तेलंगणा आमदार जीवन रेड्डी, पक्षाचे महासचिव हिमांशूजी तिवारी, महाराष्ट्र किसान समितीचे अध्यक्ष माणिकजी कदम , कोकण मुंबई समन्वयक प्रा. विजय मोहिते,

माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे,नाशिक विभागीय समन्वयक दशरथ सावंत,पुणे विभागीय समन्वयक बाळासाहेब देशमुख , मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब बच्छाव, अमरावती विभाग समन्वयक निखिल देशमुख, नागपूर विभाग समन्वयक ज्ञानेश वाकुडकर व महाराष्ट्रातील बी. आर. एस. च्या सर्व विभागाचे प्रमुख समन्वयक करत आहे.

तेलंगणा मॉडेल प्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्या त्या सुविधांची माहिती, प्रचार यात्रे दरम्यान प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, त्यासाठी नियोजन केले जात आहे. तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रति एकरी पीक व्यवस्थापनासाठी दर वर्षी खर्च केल्या जात आहे.

दलित बंधू योजनेतून दलितांना दहा लाख रुपये निधी, तसेच शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केल्या जात आहे. मुला- मुलींच्या लग्नासाठी सहायता निधी दिल्या जात आहे. सामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम तेलंगाना सरकार करीत आहे. महाराष्ट्रात सुद्धा या योजना लागू व्हाव्या . यासाठी के. चंद्रशेखर राव आणि त्यांच्या

प्रमुख नेत्यांनी, महाराष्ट्रात राजकीय आघाडी उभी करण्याचे ठरविले आहे.या देशात शेतकऱ्यांचे हितांच्या योजना आणण्यासाठी, महाराष्ट्रात खासदार, आमदार भारत राष्ट्र समितीचे निवडून आणण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी वाटचाल सुरू केली .महाराष्ट्रात अबकी बार, किसान सरकार

आणण्यासाठी 288 मतदारसंघात घोडदौड करीत आहेत. या कामाचे नियोजन होऊन पुढील राजकीय नीती आखण्यासाठी कार्यकर्त्यांचे शिबिर नांदेड येथे घेण्यात येत आहे. या कार्यशाळेला महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातून दोन-तीन कार्यकर्ते व सर्व जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित राहतील . या चर्चासत्राचा समारोप झाल्यानंतर पुढे शिवतीर्थावरून व नागपूर येथील दीक्षाभूमीवरून ही प्रचार यात्रा महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात पोहचणार आहे.

[ प्रचार यात्रेतून तेलंगणा मॉडेलची माहिती देणार: नाना बच्छाव

पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक मतदारसंघातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना नांदेड येथील कार्यशाळेत मार्गदर्शन होईल .या कार्यशाळेला महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातून दोन-तीन कार्यकर्ते व सर्व जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित राहतील . या चर्चासत्राचा समारोप झाल्यानंतर पुढे शिवतीर्थावरून व नागपूर येथील दीक्षाभूमीवरून ही प्रचार यात्रा महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात पोहचणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोठ्या संख्येने शेतकरी, व महिला आघाडी प्रचार यात्रेत सामील होऊन तेलंगणा मॉडेलची माहिती देण्यात येईल अशी माहिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नाना बच्छाव यांनी दिली आहे.]

[शेतकऱ्यांना सरकारकडून 1 रूपयात पीकविमा देण्यासाठी भाग पाडले,सोलरच्या मदतीने दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न, शेतकऱ्यांना सरकारकडून 2 हजार देऊ अशी घोषणा करावी लागली असे व अजुन बरीच कामं आहेत जे अनेक वर्षे झालेली नाहीत तसेच मराठवाडा विभागीय आयुक्त सुधीर केंद्रेकर यांनी शासनाकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रतिएकर 10 हजार देण्यासाठी शिफारस केली आहे हे आमचं भारत राष्ट्र समितीचे यश आहे.]

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!