Sunday, June 4, 2023

सोनई येथील ‘आनंदवन’चे पसायदान भुमीपुत्र पुरस्कार जाहीर

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

नेवासा

नेवासा तालुक्यातील सोनई याथील पसायदान- आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात येणारे पसायदान भुमीपुत्र पुरस्कार जाहीर करण्यात आले असून महंत उध्दव महाराज मंडलिक व जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या हस्ते शनिवार दि. २० मे २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता पुरस्काराचे वितरण होणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष उदय पालवे व सचिव संजय गर्जे यांनी दिली.

सोनईचे भुमीपुत्र व डाॅ.पंजाबराव देशमुख विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ.शरद गडाख,अमेरिकेत असलेले डिझाईन इंजिनिअर व युवा संशोधक अभिजित होशिंग, भारतीय सैन्यदलात कमी वयात झालेले कर्नल श्रीकांत काकडे, नंदुरबारचे जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ तर अध्यात्मिक सेवाकार्याबद्दल कारभारी महाराज झरेकर यांची पसायदान भुमीपुत्र पुरस्कार करीता निवड झालेली आहे.

जगदंबादेवी मंदीर सभागृहात होणा-या पुरस्कार वितरण कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनिल गडाख, संत निरंकारीचे विठ्ठल महाराज खाडे, साध्वी तुलसीदेवी,ओमशांतीच्या उषादिदी,सोनईचे सरपंच धनंजय वाघ,शनैश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.सकाळी नऊ ते अकरा उध्दव महाराज यांचे काल्याचे किर्तन व अकरा ते साडे अकरा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. ग्रामस्थ व भाविकभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले व गोविंद महाराज निमसे यांनी केले आहे.

संस्थेच्या ध्यानमंदीर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या महिला पारायण सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण वाचन,हरिपाठ व भजनसंध्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथ मिरवणूक, ग्रंथपूजन व मातृपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.तुलसी व पंचवटी प्रदक्षिणा सोहळ्यास महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!