नेवासा
नेवासा तालुक्यातील देवगाव येथील पत्रकार सोपान भगत यांना राज्यस्तरीय सामाजिक पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी अनंत बहद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने प्रतीवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात नावीन्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नेवासा तालुक्यातील देवगाव येथील पत्रकार सोपान भगत यांना यंदाचा राज्यस्तरीय सामाजिक पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
दि १७ मे रोजी नगर येथे माजी मंत्री प्रा.राम शिंदे, जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातपुते यांचे हस्ते व संस्थेचे अध्यक्ष एस एच बेग आणि जेष्ठ पत्रकार इकबाल शेख यांचे उपस्थितीत
११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन श्री.भगत यांना गौरविण्यात आले.