नेवासा
नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला- बाभुळवेडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत बाभूळवेढा शिवारात सुरू होणाऱ्या कला केंद्राला ना हरकत दाखला देण्यास विरोध करणारा ठराव एक मुखी मंजूर करण्यातआला आहे.
तालुक्यातील बाभूळवेढा येथे सुरु होत असलेल्या नाच-गाण्याचे कला केंद्रासाठी ना हरकत दाखला देण्याचे विषयावर पोलीस बंदोबस्तात गुरुवार दि.१८ रोजी सकाळी १० वाजता
सरपंच किशोर सुकाळकर यांच्या अध्यक्षतेखाली उस्थळ दुमाला- बाभुळवेडा ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात बोलाविलेल्या विशेष ग्रामसभेत सर्वानुमते घुंगराच्या आवाजाला नापसंती व्यक्त करत या विशेष ग्रामसभेत दोनशे महीला व चारशे पुरुषांनी या ग्रामसभेला हजेरी लावत कला केंद्राला ‘ना’हरकत दाखला नामंजूर करण्याचा एकमुखी निर्णय या बैठकीत घेतल्यामुळे अखेर छमछमचा आवाज सुरु होण्याआधीच बंद करण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,बाभूळवेढे शिवारात कला केंद्र सुरु करण्यासाठी सचिन वसंत काळे व सुवर्णा वसंत काळे यांनी कला केंद्र सुरु होण्याकामी ग्रामपंचायतीकडे ‘ना’हरकत दाखला मिळण्यासाठी रितसर अर्ज केलेला होता. त्यामुळे सरपंच किशोर सुकाळकर यांनी विशेष ग्रामसभा बोलावून सर्वानुमते निर्णय
घेण्याचे ठरले होते.त्यानुसार गुरुवार दि.१८ रोजी सकाळी १० वाजता पोलीस बंदोबस्तात ही विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेला दोनशे महीला व चारशे पुरुषांनी हजेरी लावून या कला केंद्राला परवानगी देवू नये अशी एकमुखी मागणी या विशेष ग्रामसभेत उपस्थित महीला व पुरुषांनी केली. त्यामुळे या कला केंद्राचा ‘ना’ हरकत दाखला नामंजूर असल्यामुळे अखेर
घुंगराचा दणदणाट कायमस्वरुपी बंद करण्यात आला.
या विशेष ग्रामसभेत जेष्ठनेते रामराव पाटील भदगले, राधाकिसन वाघ,कुंडलिक चिंधे,ञिंबक भदगले यांनी गावांत कला केंद्राला मंजूरी देवू नये अशी मागणी केली.या मागणीला सर्वानुमते दुजोरा देण्यात आला अन् अखेर छमछमचा आवाज विशेष ग्रामसभेने हाणून पाडला आहे.या विशेष ग्रामसभेला सोसायटी अध्यक्ष देविदास वाघ,प्रशांत सुकाळकर, कैलास पिटेकर,
राजेंद्र सानप,संदिप काळे,चंद्रशेखर सुकाळकर, बाबासाहेब सुकाळकर,तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र गायकवाड,जयसिंग गायकवाड, बद्रिनाथ चिंधे, डॉ.राधाकृष्ण सुकाळकर,बंडू सानप,बाळासाहेब सानप,जयसिंग सानप,मोहन सुकाळकर,बापूराव गायकवाड,दादा वाघ,गणेश गायकवाड यांच्यासह यावेळी या विशेष ग्रामसभेला महीला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.