Thursday, October 5, 2023

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी २५ मे पासून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

मुंबई, दि. १९

राज्य शासनाच्या वतीने शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन २०२२-२३ च्या या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून नाव नोंदणी दि.२५ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून https://forms.gle/z5mw9A2dTu6J3zyNA या लिंकवर सुरू होणार आहे.

या पुरस्कारासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक/माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी  दि. १५ जून २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक पुणे यांनी केले आहे

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!