Friday, December 3, 2021

कामगार नेते नितीन पवार यांना मातृशोक…नंदाताई बबनराव पवार यांचे निधन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :– तालुक्यातील वडाळा महादेव येथील रहिवासी असलेले महाराष्ट्र राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या मातोश्री गं.भा. नंदाताई बबनराव पवार (वय 76 वर्षे) यांचे रविवार दि.18 एप्रिल रोजी दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.

कै.नंदाताई पवार यांच्या वर पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक मध्ये काही दिवसांपासून उपचार सुरू होते.रविवार दि.18 एप्रिल रोजी दुपारी उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. रविवारी रात्री श्रीरामपूर येथील अमरधाम मध्ये त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आला.

त्यांच्या मागे दोन मुले,तीन मुली, सुना,नातवंडे असा परिवार आहे.दिवंगत साखर कामगारांचे नेते बबनराव पवार यांच्या त्या पत्नी,महाराष्ट्र राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार व पुणे येथील उद्योजक हेमंत पवार यांच्या त्या मातोश्री होत.

मुळा उद्योग समूहाचे प्रमुख व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख,ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील,माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,वृद्धेश्वर कारखान्याच्या प्रमुख आमदार मोनिकाताई राजळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक,श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक,कामगार नेते अविनाश आपटे,अशोक बिरासदार,रामनाथ गरड,डी. एम.निमसे,सुखदेव फुलारी यांनी पवार कुटुंबियांचे सांत्वन केले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!