राहुरी
देवळाली प्रवराचे शहराचे सुपुत्र चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांना श्री शनैश्वर मंदिर जीर्णोद्धार समिती बेलापूर यांच्याकडून पहिला मानाचा शनिरत्न पुरस्कार शनिजयंतीनिमित्त सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सामाजिक , धार्मिक, उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांच्या कार्याची दखल घेत आजतागायत विविध सामाजिक संस्थांनी गौरविले असून शनैश्वर मंदिर जीर्णोद्धार समिती बेलापूर यांच्याकडून पहिला मानाचा शनिरत्न पुरस्कार बेलापूरातील आझाद मैदानावर सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रीमती अनुराधा पौडवाल यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. गणेश भांड व सौ.मंदाताई भांड यांनी हा बहुमान स्वीकारला.
या कार्यक्रमास शिवसेना नेते व माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, श्री शनैश्वर मंदिर जीर्णोद्धार समिती बेलापूरचे प्रमुख विश्वस्त महंत दीपकदास कैलासदास वैष्णव, श्रीरामपूर बाजार समिती सभापती सुधीर नवले, उपसभापती अभिषेक खंडागळे, संत महिपती देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, राज्य पोलीस पाटील संघटनेचे अँड.साईराम बानकर, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ जगताप, शिवसेनेचे अशोक थोरे, अण्णा म्हसे, संपत महाराज जाधव,पत्रकार रफिक शेख,श्रीकांत जाधव, गोविंद फुणगे,ऋषि राऊत, विलास भालेराव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.