माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील नगर मनमाड महामार्गावर येसगाव परिसरात साई लॉन जवळ सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस तोडणीला जात असलेल्या
टायर बैलगाड्यावर अज्ञात वाहनाच्या (ट्रक) धडकेमध्ये बैलगाडीचा चक्काचूर झाला असून यामध्ये ऊस तोडणी महिला कामगार मोनाबाई दादाजी पवार वय 27 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर दादा अकडू
पवार व कल्याबाई सुभाष अहिरे हे गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमध्ये तीन बैलांचा जागीच मृत्यू झाला तर दोन बैलही जखमी झाले.सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात मालेगाव येथील केदा भिवसेन पाटील
या मुकादमाची ऊस तोडणी कामगारांची टायर बैलगाडीची गॅंग आहे. कारखान्यांमार्फत येसगाव शिवारात पहाटेच ऊस तोडणीसाठी टायर बैलगाडी मजुरांची टोळी चालली होती. सहा वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने दादा
आकडू पवार यांच्या टायर बैलगाडीला जोरात धडक दिल्याने गाडीचा चक्काचूर होत यामध्ये त्यांची पत्नी मोनाबाई दादाजी पवार यामध्ये ठार झाल्या तर दादाजी पवार व कलाबाई अहिरे हे गंभीर जखमी झाले. तीन बैलांचा मृत्यू होऊन दोन बैलही जखमी झाले आहेत.
दुर्घटनेत मयत झालेल्या मोनाबाई दादाजी पवार यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर जखमीना कोपरगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल केले.पशु वैद्यकीय अधिकारी डॉ कोळपे व श्रीमती काटे
यांनी बैलांचे शेव विसर्जन केले तर जखमी बैलावर उपचार केले. कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश आव्हाड करीत आहे.