Wednesday, May 25, 2022

थांबा :रस पिताय? एफडीएने केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उन्हाळ्याची चाहूल लागल्याने आता सरबत, लस्सी, बर्फ गोळा, ताक, आइस्क्रीम यांसारख्या शीतपेयांना पसंती वाढली आहे. त्यासाठी बर्फाची मागणी वाढली असून, विविध प्रकारचे रस पीत असाल, तर सावधान…!

रस किंवा अन्य शीतपेयांमध्ये वापरला जाणाऱ्या बर्फाचा दर्जा तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बर्फामध्ये निळसर खाद्यरंगाचा किमान १० पीपीएम एवढाच वापर करण्यात आला असावा, असे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) खाद्यविक्रेत्यांना बजावले आहे.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर थंड पदार्थांची मागणी वाढते. त्या वेळी बर्फासारख्या पदार्थाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. भेसळयुक्त बर्फ असण्याची शक्यता असल्याने आता बर्फ किंवा शीतपेयांची तपासणी करण्यासाठी ‘एफडीए’ने मोहीम सुरू केली आहे.

त्या मोहिमेतंर्गत बर्फाच्या दर्जासह विविध प्रकारची तपासणी केली जाणार आहे.तहान भागविण्यासाठी सरबत, लस्सी, बर्फ गोळा, नीरा, ताक, ज्यूस, आइस्क्रीम, कोल्ड्रिंक्सचे सेवन केले जाते. खाण्याचा बर्फ किंवा कच्चा माल आणि तयार

अन्नपदार्थाच्या दर्जाची खात्री करणे आवश्यक आहे. ‘एफडीए’ने मोहीम सुरू केली आहे. राज्यात बर्फाचे उत्पादन करताना खाद्यदर्जाचा बर्फ हा पिण्यायोग्य पाण्यापासून तयार करण्यात यावा; तो रंगहीन असावा. अखाद्य बर्फात खाद्योपयोगासाठी

वापरण्यात येणारा रंग ‘इंडिगो कॅरमाइन’ किंवा ‘ब्रिलियंट ब्लू एफसीएफ’ रंग अत्यल्प प्रमाणात निळसर रंगाची छटा निर्माण होईल एवढा किमान १० पीपीएम खाद्यरंग टाकावा,’ असे आवाहन ‘एफडीए’चे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी केले.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!