Wednesday, May 25, 2022

WhatsApp वापरावर आता येणार आणखी बंधनं येणार?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जगभरातले अब्जावधी नागरिक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. आतापर्यंत या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या काही चांगल्या आणि वाईट गोष्टी समोर आल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड्सचे अनेक वाईट पैलू निदर्शनास आले आहेत, त्यामुळे अ‍ॅपद्वारे चुकीची माहिती आणि खोट्या बातम्यांचा प्रसार मर्यादित करण्यासाठी कंपनीने कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत.WABetainfoच्या अहवालानुसार,

व्हॉट्सअ‍ॅप हा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आता सर्व मेसेजेसच्या फॉरवर्डिंगवर आणखी मर्यादा घालू इच्छित आहे. हाती आलेल्या रिपोर्टनुसार, हे नवीन फीचर व्हॉट्सअ‍ॅप बीटाच्या v2.22.7.2 अँड्रॉइड व्हर्जनमध्ये (Android Version) दिलं जाणार आहे.

जेव्हा व्हॉट्सअ‍ॅप युझर्सना एकापेक्षा जास्त ग्रुपवर व्हायरल फॉरवर्डेड मेसेज पाठवायचा असेल तेव्हा त्यांना स्क्रीनवर ‘फॉरवर्डेड मेसेज कॅन बी सेंट टू ओन्ली वन ग्रुप’ असा मजकूर दिसत असल्याचं संबंधित रिपोर्टमध्ये दिलेल्या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे.

सध्या व्हॉट्सअ‍ॅप युझर्स एक व्हायरल फॉरवर्ड मेसेज फक्त एका चॅटवर शेअर करू शकतात. त्यानंतर त्यांना इतरांकडून फॉरवर्ड केलेल्या मेसेजची मर्यादा आणि वारंवारता याबद्दल अलर्ट केलं जाईल.

सोशल मीडिया इकोसिस्टीममध्ये व्हायरल होण्यासाठी डिझाइन केलेल्या विशिष्ट मेसेजेसचा रीच मर्यादित करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं या बदलातून निदर्शनास येत आहे.

मेसेज फॉरवर्डिंगची प्रक्रिया अधिक कंटाळवाणी करण्याच्या प्रयत्नात व्हॉट्सअ‍ॅप असल्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!