माय महाराष्ट्र न्यूज: समाजामध्ये पैशामागे व प्रसिद्धी मागे पडणारे अनेक माणसे आम्ही पाहिली आहेत मात्र आपल्या कार्य कर्तृत्वातून आपला सामान्य माणसांमध्ये वेगळा ठसा उमटवून समाज हित जोपासणारा
माणूस असा उल्लेख साई आदर्श मल्टीस्टेट चे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांचा करावा लागेल असे प्रतिपादन श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी केले आहे.
याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यामध्ये आर्थिक दृष्ट्या अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबीरा च्या ज्या रुग्णांना चष्म्याची आवश्यकता आहे .
अशा रुग्णांना चष्मे वाटपाचा कार्यक्रम श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व राहुरी चे तहसीलदार फैजउद्दीन शेख यांच्या शुभहस्ते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांच्यासह
साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी बोलताना संदीप मिटके यांनी सांगितले की, समाजामध्ये अनेक माणसं बघावयास मिळतात काहीजण पैशाच्या
मागे तर काहीजण प्रसिद्धीच्या मागे लागलेले असतात मात्र शिवाजीराव कपाळे यांनी साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा जिल्हाभरात निर्माण केलेला आहे त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून केवळ अर्थकारण न करता
समाजकारणाचा वसा हाती घेतल्याने या संस्थेचा नावलौकिक सर्वत्र वाढत आहे याचा मनस्वी आनंद आम्हास आहे त्यांच्या हातून असेच समाजो उपयोगी कामे व्हावीत ही शुभेच्छा आमची नेहमीच असणार आहे.यावेळी बोलताना तहसीलदार फैजउद्दीन शेख
यांनी सांगितले की, राहुरी तालुक्यामध्ये काम करत असताना अनेकांशी संबंध आला मात्र शिवाजीराव कपाळे हे व्यक्तिमत्व समाजाला आदर्श देऊन जाणारे आहे त्यांनी यशाचे जे शिखर गाठले आहे त्याची तुलना करता
येण्याजोगी नाही साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेचा त्यांनी कमी कालावधीमध्ये वटवृक्ष बनवला आहे केवळ संस्था नावे तर कुटुंब संभाळत असताना त्यांनी आपला आदर्श सर्वांसमोर उभा केला आहे कोरोना कालावधीमध्ये
त्यांनी संस्थेच्या माध्यमातून केलेले काम उल्लेखनीय आहे त्यांनी स्वतःला समाजासाठी झोकून दिले असल्याने त्यांच्या या कार्याची दखल समाज देखील निश्चित घेईल असा मला विश्वास आहे.
यावेळी शिवाजीराव कपाळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, संस्थेच्या माध्यमातून आम्ही सामाजिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून कार्य करत असतो या संस्थेच्या माध्यमातून सेवा प्रवृत्तीने काम करत असताना या रुग्णांना मिळालेली रुग्ण
सेवा आम्हाला हे आम्हाला महत्वपूर्ण वाटते त्यांचे आशीर्वाद आम्हाला सर्व काही देऊन जातात ही संस्था केवळ अर्थकारणा पुरती मर्यादित न ठेवता आम्ही सर्व सामान्य जनतेला या संस्थेच्या माध्यमातून सेवा देण्याचे
काम केलेले आहे आणि हेच काम आम्ही ईश्वर सेवा म्हणून अविरत सुरू ठेवू यात कोणीही शंका बाळगू नये. संस्थेवर सर्वांचा विश्वास आहे या विश्वासास देखील आम्ही पात्र राहू यात कोणीही शंका बाळगू नये असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी पत्रकार रफिक शेख,सुरेश घोडके यांची भाषणे झाले.कार्यक्रमास संस्थेचे संचालक अविनाश साबरे ,बाळासाहेब तांबे, डॉ. विलास पाटील,साई अँग्रोचे चेअरमन वेदांत कपाळे, सीध्दार्थ वाबळे,अद्भुत कुलकर्णी ,बाळासाहेब सोनवणे,अन्सार शेख
संस्थेचे मॅनेजर सचिन खडके ,याकुब शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी सुमारे 55 नेत्र रूग्णांना संस्थेच्या वतीने विनामूल्य चष्म्याचे वाटप करण्यात आले त्याच प्रमाणे ज्या रुग्णांचे साई आदर्श मल्टीस्टेट व केके बुधरानी यांच्या
माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे त्यांचा खर्च देखील संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे जाहीर करत कपाळे यांनी ज्या शाखेचा वर्धापन दिन असेल त्या ठिकाणी नेत्रतपासणी शिबिर घेऊन मोतीबिंदू शस्त्रक्रिया संस्थेच्या माध्यमातून
केल्या जातील असे जाहीर केले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार गणेश विघे यांनी केले तर आभार अविनाश साबरे यांनी मानले.