सोनई/प्रतिनिधी
कामगार कायदे मोडीत काढणाऱ्या केंद्र सरकारला धडा शिकवा असे आवाहन महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी केले.
नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्यावर आज महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी भेट देऊन कामगारांशी संवाद साधला.
सोमेश्वर कारखाना कामगार प्रतिनिधी शहाजी जाधव, माळेगाव कारखाना प्रतिनिधी अर्जुन देवकर, तुकाराम चव्हाण, ज्ञानेश्वर कारखाना प्रतिनिधी अशोक आरगडे, रावसाहेब नवले, शिवाजी भातंकरे, वृध्देश्वरचे अंकुशराव जगताप,मुळा कारखान्याचे कामगार संचालक विश्वास डेरे व किशोर राजगुरु,मुळा कारखाना युनियनचे कार्याध्यक्ष कारभारी लोडे, उपाध्यक्ष शिवाजी जाधव, खजिनदार सुभाष सोनवणे, शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त आदिनाथ शेटे युनियन सदस्य सुदाम कोरडे, वामन निमसे, सचिन काळे, प्रकाश जठार, राजेंद्र शिंदे, अमोल टेमक, नानासाहेब गडाख, स्वप्नील मोरे, हर्षल टिक्कल, आदेश गायके, अजित जाधव, रमेश गुडधे, नितीन शेटे, अमोल तोगे, बाळासाहेब घावटे व कामगार यावेळी उपस्थित होते.जिल्ह्यातील सर्व कारखान्याचे प्रतिनिधी आज मुळा कारखान्यावर साखर कामगारांच्या प्रश्ना संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी एकत्र जमले होते.
श्री.तात्यासाहेब काळे यांनी कामगारांच्या अडचणी, ग्रॅज्युईटी इ. मुद्दे उपस्थित करून सध्या लोकसभे मध्ये कामगार विषयी जे बील पास झाले, त्याला राज्यातील साखर कामगारांनी एकजुटीने विरोध केला पाहिजे. तसेच सध्या जे पेन्शनर्सचे जे आंदोलन गेल्या ५ ते ६ वर्षापासुन चालु आहे. त्यांना दरमहा किमान ७५०० रुपये पेन्शन मिळणे गरजेचे आहे. साखर कामगारांच्या वेतन मंडळाची मुदत मार्च २०२४ मध्ये संपत आहे. त्यासंदर्भात राज्य पातळीवर वेतन मंडळाची कमिटी स्थापन होण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व संघटनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
मुळा कारखाना कामगार युनियनचे सेक्रेटरी डी.एम. निमसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.
नेवासा तालुका कामगार मंडळाचे अध्यक्ष अशोकराव पवार, संदिप दहिफळे, पी. आर. मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
अशोक अरगडे यांनी आभार मानले.
श्री काळे यांनी श्रीक्षेत्र शिंगणापूर येथे भेट देऊन शनी अभिषेक करून दर्शन घेतले