माय महाराष्ट्र न्यूज:इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या साथ व संसर्गजन्य रोग विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर नगरला आले होते. येथील साईदीप रुग्णालयात भेट दिली.
रुग्णालयाचे प्रमुख डॉ. एस. एस. दीपक यांनी करोना काळात केलल्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. डॉ. दीपक यांना लंडन येथील संस्थेच्यावतीने करोना योद्धा पुरस्कार देण्यात आला आहे.
त्याचे प्रमाणपत्र डॉ. गंगाखेड यांच्या हस्ते डॉ. दीपक यांना प्रदान करण्यात आले. त्यानंतर डॉ. गंगाखेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.सध्या तरी आपल्या देशात करोनाचा फैलाव अटोक्यात आला आहे.
तरीही बेसावध राहून चालणार नाही. चीनमध्ये पुन्हा करोनाचा फैलाव वाढत आहे. तूर्त आपल्याकडे त्याचा धोका नसला तरी पुढील तीन महिन्यांत करोनाची लाट पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही’, अशी माहिती गंगाखेडकर यांनी दिली.
करोनाच्या काळात आपल्या वैद्यकीय संशोधकांनी चांगले काम केले. भारतीय संशोधकांनी तब्बल ५८ नवी औषधे शोधली. यापूर्वी आयात करावी लागणारी अनेक औधषे आता आपल्या देशातच तयार होऊ लागली आहेत. करोनावर लसीकरण
हाच खात्रीशीर उपाय आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना संसर्ग झाला तरीही रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत नाही, हे आढळून आलेले आहे. त्यामुळे लसीकरण करून घेण्यावर भर द्यावाच लागले. प्रतिकारशक्तीसाठी कोणतेही खात्रीशीर औषध नसते.
त्यामुळे त्यावर अशा औषधांवर विसंबून राहण्यापेक्षा लसीकरणाकडेच लक्ष दिले पाहिजे. सुरवातीच्या काळात आपल्या देशात पुरेशा वैद्यकीय सुविधा नव्हत्या. त्यामुळे कडक निर्बंध लावावे लागले. त्या काळात सुविधा उभारता आल्या.
त्यामुळे करोनाची लाट आपल्याकडे उशीर आली. आता जगातील स्थितीवर लक्ष ठेवत आपण काळजी घेणे सूरूच ठेवले पाहिजे’, असेही डॉ. गंगाखेडकर म्हणाले.