माय महाराष्ट्र न्यूज:देवेंद्र फडणवीस हे दहा-वीस पवार खिशात घालून फिरतात. शरद पवार हे ज्येष्ठ आहेत, पण श्रेष्ठ नाहीयत. त्यांचा विषय असा आहे की, काहीही केले, तर मीच केले म्हणतात, अशी जोरदार टीका शुक्रवारी
आमदार गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली.भाजप नेते आणि आमदार गोपिचंद पडळकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे दहा-वीस पवार
खिशात घालून फिरतात. शरद पवार हे ज्येष्ठ आहेत, पण श्रेष्ठ नाहीयत. त्यांचा विषय असा आहे की, काहीही केले, तर मीच केले म्हणतात. माझ्यापेक्षा कोण पुढे जाता कामा नये, अशी त्यांची वृत्ती आहे. पण, माननीय देवेंद्रजी असे
दहा-वीस शरद पवार खिशात घालून फिरतात. त्यांच्यापेक्षा किती तरी प्रगल्भ नेतृत्व देवेंद्रजींचे आहे. फक्त विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा, राष्ट्राच्या विरोधातली भूमिका ही शरदचंद्र पवारांची आहे.
तसले विषय सोडून त्यांच्या पुढचे नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्रजींच्या नेतृत्वात आहे, असा दावा त्यांनी केला.महाराष्ट्रातील प्रस्थापित पवार आणि पाटलांच्या विरोधातील लढा चालूच ठेवेन, असे गोपीचंद पडळकर म्हणाले होते.
त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पवारविरोधातील राग आळवला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांना कोण उत्तर देणार, याची प्रतीक्षा आहे.