माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अवकाळी पावसाची स्थिती कायम आहे. आज कोकण, घाट परिसर आणि लगतच्या मराठवाड्यातील काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्यानं आज पुण्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक या नऊ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. आज सकाळपासूनच याठिकाणी
ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. येत्या काही तासात संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान आकाशात मोठ्या प्रमाणात विजा
चमकण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी लांबचा प्रवास टाळावा तसेच मोठ्या झाडाच्या आडोशाला न थांबण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.याशिवाय आज ठाणे, रायगड, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, नंदुरबार, धुळे,
जळगाव आणि औरंगाबाद या जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जना होणार आहे. उद्यापासून राज्यात अवकाळी पावसाचा जोर कमी होणार आहे. उद्या कोकण,
घाट परिसर आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ हवामान राहणार आहे. पण याठिकाणी हवामान खात्यानं कोणताही इशारा दिला नाही.