Tuesday, May 17, 2022

नगर ब्रेकिंग: भीषण अपघात पाच जण जागीच ठार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अक्कलकोट-गाणगापूर रोडवर कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 04 महिला आणि 01 चालक असे एकूण 05 जण जागीच ठार झालेत. अहमदनगरहून गाणगापूरला दर्शनासाठी गेले होते.

गाणगापूरहून परत अहमदनगरला परतत असताना चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात गाडी झाडावर आदळली आणि पाच जण जागीच ठार झालेत. अपघातातील पाचही जणांचे मृतदेह

शवविच्छेदनासाठी कर्नाटकातील अफझलपूर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. कर्नाटकातील अफझलपूर पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. अक्कलकोट गाणगापूर रोडवर बळोरगी जवळ हा अपघात झाला.

MH 16 BH 5392 असा गाडीचा नंबर आहे. शिकाऊ चिन्ह असलेलं ‘L’ असं देखील गाडीच्या मागच्या काचेवर दिसून आलं आहे. डॅटसन गो प्लस या गाठीतून हे सर्वजण प्रवास करत होते. दरम्यान, गाडीनं

समोरच्या बाजूनंच झाडाला धडक दिली आणि यात कारचा चक्काचूर झालाय. तर गाडीतील पाच जणांना जबर मार लागून त्यांचाही जागीच मृत्यू झाला आहे.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनीच घटनास्थळी

धाव घेतली. यानंतर स्थानिकांनी गाडीतील मृतदेह बाहेर काढलेत. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. तर एक पुरुष चालकाचाही मृत्यू झाला आहे.रक्तबंबाळ अवस्थेत गाडीतच प्रवाशांचे मृतदेह अडकून पडले होते. तर गाडी रस्ता साडून एका बाजूला कलंडली होती.

गाडीच्या मागच्या आणि पुढच्या दोन्ही काचा फुटल्या होत्या. दरम्यान, आता पोलिस या अपघाताबाबत अधिक तपास करत आहेत. सध्या अपघातातील सर्व मृतदेह हे शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मोठा अपघात

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भाव स्थिर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला.बाजार समितीत सोमवारी 8855 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला...

आता चॅट आणखी सोपं होणार, WhatsApp च्या नव्या फीचरचं

माय महाराष्ट्र न्यूज:WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवे फीचर्स अपडेट करत असतं. आता पुन्हा एकदा WhatsApp एका नव्या अपडेटवर काम करत आहे. व्हॉट्सअॅपकडून एका नव्या चॅट...

राम साधना आश्रम मुकींदपुर येथे काल्याच्या कीर्तन निमित्ताने सुभाषशेट विखोना व विखोना परीवारच्या वतीने महाप्रसाद

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुकींदपुर येथे भव्य श्रीराम जन्मोत्सव कीर्तन महोत्सव व यज्ञ तसेच राम कथा पार पडत आहे त्या निमित्ताने...
error: Content is protected !!