Tuesday, May 17, 2022

नगर मोठी ब्रेकिंग:नगर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समितींवर या तारखेपासून प्रशासक राज, राज्य सरकारचा आदेश जारी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :राज्यभरातील जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांची मुदत या महिन्यात संपत आहे. तसेच या संस्थांच्या निवडणूका किमान 4 महिने तरी घेणे शक्य नसल्याचे

चित्र असल्याने आता जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांवर 4 महिन्यांसाठी प्रशासक नेमण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. ओबीसी आरक्षण पुढे गेल्याने नगर जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांवर 13 मार्च

तर जिल्हा परिषदेवर 20 मार्चपासून प्रशासकांची नियुक्ती करण्यात येत असून याबाबत ग्रामविकास खात्याने शासन निर्णय जारी केला आहे.ओबीसी आरक्षणाचा निर्णय न्यायालयात झाला नसल्याने विधीमंडळात आरक्षणाबाबत नवीन विधेयक मांडण्यात आले.

तसेच होऊ घातलेल्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सर्वपक्षीयांनी घेतला. ओबीसींच्या राजकीय आरक्षण सुधारणा विधेयकाला राज्यपालांनी स्वाक्षरी करुन मंजुरी दिली आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाचे

काही अधिकार राज्य सरकारने घेतल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या आहेत.ओबीसी आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी झाल्यानंतर राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने जीआर काढून राज्यातील

मुदत संपण्याच्या मार्गावर असणार्‍या जिल्हा परिषदा व आणि पंचायत समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. या जीआरनुसार अहमदनगर जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांवर 13 मार्चपासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेवर 20 मार्चपासून प्रशासक येणार असल्याचे या शासन निर्णयात म्हटले आहे.जिल्हा परिषदेवर सीईओ राजेंद्र क्षीरसागर यांची प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. परंतु सीईओ क्षीरसागर यांची मंत्रालयात बदली झाली

असल्याने जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 14 पंचायत समित्यांवर तेथील गटविकास अधिकार्‍यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

प्रशासकांच्या नियुक्त्या चार महिन्यांसाठी करण्यात आल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!