माय महाराष्ट्र न्यूज:ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेने शनिवारी पीएफवर मिळणारे व्याज निश्चित केले आहे. मात्र, यावेळी हे व्याज गेल्या 40 वर्षांतील सर्वात कमी असल्याने पगारदारांना मोठा झटका बसला आहे. EPFO ने 2021-2022 या
आर्थिक वर्षासाठी 8.1 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. गेल्या 10 वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ईपीएफओच्या सुमारे सहा कोटी लोकांना धक्का बसला आहे. गेल्या आर्थिक वर्षात पीएफवर 8.5 टक्के व्याज मिळत होते.
पीएफ व्याजदारबाबत गुवाहाटी येथे ईपीएफओ सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची दोन दिवस बैठक सुरु होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.मागील दोन वर्षात व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. पहिल्यादा आर्थिक वईष 2019-20 मध्ये
व्याजदरात कपात करुने ते 8.5 ट्क्के करण्यात आले होते. त्यानंतर आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये त्यात कोणताही बदल करण्यात आला नव्हता एकीकडे महागाई सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे, सरकारने पीएफवरील व्याज कमी केले आहे. 1977-78 या आर्थिक
वर्षात EPFO ने 8 टक्के व्याजदर निश्चित केला होता. त्यानंतर आता इतके कमी व्याज मिळत आहे. आत्तापर्यंत 8.25 टक्के किंवा त्याहून अधिक व्याज दिले गेले आहे.