माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रात यंदा उसाचे उत्पन्न वाढल्यानं गाळपाचं कारखान्यांपुढं मोठं आव्हान आहे. गेल्या दोन वर्षात चांगला झालेला पाऊस, दुष्काळी भागात पोहचलेल्या पाण्यामुळं शेतकऱ्यांनी उसाचं चांगलं
उत्पादन घेतलंय. त्यामुळं सर्व कारखान्यांना संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय बंद न करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.मंत्री पाटील पुढे म्हणाले, अतिरिक्त उसाच्या बाबतीतला प्रश्न दर पाच-सहा वर्षांनी
निर्माण होतो. कारण, पट्टा पद्धत, ड्रिप पध्दतीमुळं उसाचं उत्पन्न वाढलं आहे. गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर आता उभा असलेला ऊस गाळपाचं मोठं आव्हान साखर कारखान्यां समोर आहे.मी सध्या सर्व राज्यातील आढावा घेत असून संपूर्ण ऊस गाळप झाला पाहिजे
असं नियोजन सुरू आहे. चालूवर्षी हेक्टरी उत्पादनही वाढलं आहे. यंदा बीड, जालना, परभणी या तीन मराठवाड्याच्या जिल्ह्यातील अनेक कारखाने बंद आहेत.जोपर्यंत उभ्या उसाचे संपूर्ण गाळप होत नाही
तोपर्यंत कारखाने बंद करू नयेत, अशा सूचना कारखान्यांना केलेल्या आहेत. तसेच साखर आयुक्तांकडून त्याचा मी स्वतः आढावा घेत असल्याचेही सहकारमंत्र्यांनी सांगितले.