Wednesday, May 25, 2022

सावधान:ती फेसबूकवर फ्रेन्ड होते, चॅट करते, नंतर नको ते दाखवते, व्हीडिओ रेकॉर्ड करते व त्यानंतर…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप अशा सोशल साईट सध्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत.सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत तितकाच त्याचा दुष्परिणामही आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून फसवणूकीच्या गुन्हांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. असंच एक प्रकरण नाशिकमध्ये उघडकीस आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नाशिकमध्ये एका तरुणाला गंडवण्यात आलं.

पूनम शर्मा नामक एका महिलेच्या फेसबुक अकाउंटवरून नाशिक मधील एका तरुणाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली. या मुलानेही फ्रेड रिक्वेस्ट स्वीकारली. त्या मुलीने या तरुणासोबत काही दिवस चॅटिंग करत

ओळख वाढवली. पुढे या मुलीने त्याचा मोबाईल नंबर मागितला. त्यानेही पुढचा-मागचा विचार न करता तिला आपला मोबाईल नंबर दिला.फेसबुकवर सुरु झालेली चॅटिंग आता व्हॉट्सअॅपवर सुरु झाली. या दोघांमध्ये अश्लिल चॅट सुरु झाले.

त्या तरुणानेही त्याला प्रतिसाद दिला. याचाच फायदा घेत मुलीने त्या तरुणाला मोबाईलवरुन व्हिडिओ कॉल केला आणि त्याच्यासमोर विवस्त्र झाली. तरुणालाही अश्लील कृत्य करण्यासाठी उत्तेजित केलं. आणि इथेच हा तरुण फसला. हा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करुन

त्या मुलीने तरुणाला पाठवला आणि यानंतर सुरु झाला ब्लॅकमेलिंगचा खेळ. मुलीने त्या तरुणाकडे पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या तरुणाने पोलिसात तक्रार दाखल केली.

अशा घटनांमध्ये हल्लीच्या काळात मोठी वाढ झाली आहे. बदनामी होऊ नये यासाठी अनेकजण पोलिसांता तक्रार करत नाहीत. याचाच फायदा या महिला घेतात.सोशल मीडियावर येणारी प्रत्येक रिक्वेस्ट तपासून घेणे तसेच आपल्या फ्रेंड लिस्ट

पैकी सदर महिलेच्या फ्रेंड लिस्ट मध्ये कोणी आहे का याची खात्री करून मगच रिक्वेस्ट स्वीकारण्याचं आवाहन पोलिसांनी केले आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!