Wednesday, May 25, 2022

विखे पाटलांचा मोठा खुलासा:हे माहिती असल्याने म्हणून मी भाजपमध्ये आलो

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेअंतर्गत अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांनी शनिवारी नगर जिल्ह्यात लाभार्थ्यांना अनेक साहित्याचे वाटप केले.यावेळी विखे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसचा आम आदमी पक्षानेधुव्वा उडवला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार सुजय विखे पाटील

यांनी मिश्किल टिप्पणी करत काँग्रेसवर जोरदार टीका केली.मी परमेश्वराचे आभार मानतो की मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो. काँग्रेसची ही अवस्था होणार हे माहित असल्यानं मी भाजपमध्ये आलो

असं वक्तव्य सुजय विखे-पाटील यांनी केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसवर जोरदार टोलेबाजीही केलीय. अहमदनगर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेतून गरजूंना साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष लाचार बनलाय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या न बोलावलेल्या

लग्नात काँग्रेस वराती म्हणून सहभागी होत आहे. काँग्रेसनं आता 40 चे शून्य होण्याची वाट पाहावी आणि नवी सुरुवात करावी, असा जोरदार टोला सुजय विखे-पाटील यांनी काँग्रेसला लगावलाय.

त्याचबरोबर शिवसेनेची स्पर्धा ही नोटाबरोबर असल्याचं गोवा आणि उत्तर प्रदेशात पाहायला मिळालं. ते नोटालाही मागे टाकू शकले नाहीत. जे प्रभारी राज्यात रोज बोलतात त्यांना पाहून गोव्याच्या जनतेनं त्यांना नाकारलं असल्याची खोचक टीका सुजय विखे यांनी शिवसेनेवर केलीय.

राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला.सत्तेतील पक्ष स्वत:चं भलं करण्याच्या मागे लागले आहेत. राज्यातील जनतेशी त्यांना काही देणंघेणं नाही, अशी जोरदार टीका विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलीय

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!