Tuesday, May 24, 2022

गोपीचंद पडळकरांचं ते विधान विकृत मनोवृत्तीचं लक्षण

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गोपीचंद पडळकर हे शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते व पवार कुटुंबावर जोरदार टीका करत असतात. पडळकर यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता.

‘देवेंद्र फडणवीस असे दहा-वीस शरद पवार खिशात घालून फिरतात’, असं वक्तव्य पडळकर यांनी केलं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही पडळकरांना प्रत्युत्तर दिलंय.

पडळकरांचं वक्तव्य म्हणजे विकृत मनोवृत्तीचं लक्षण असल्याची टीका चाकणकरांनी केलीय.चाकणकरांचं पडळकरांना प्रत्युत्तर दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि हे सरकार अतिशय उत्तमरित्या काम करत आहे.

कोरोनासारख्या महामारीत राज्याच्या पालकत्वाची जबाबदारी कशी निभवावी हे महाविकास आघाडी सरकारनं दाखवून दिलंय. महाराष्ट्र आणि जनतेची काळजी घेत असताना महाविकास आघाडीसोबत राज्यातील जनताही उभी राहिली.

विरोधकांना आता हे सहन होत नाही. त्यांच्याकडे टीका करण्यासाठी विषय नाहीत. कोणतेही पुरावे हातात नसताना केवळ महाविकालस आघाडी सरकारवर टीका करायची आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा, हा एककलमी कार्यक्रम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे.

एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन ते टीका करत आहेत, याचा अर्थ हे त्यांच्या मानसिक नैराश्याचं प्रतिक आहे. त्यांना किती नैराश्य आलेलं आहे, हे त्यांच्या सततच्या वक्तव्यातून दिसून येतं’, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी पडळकरांना प्रत्युत्तर दिलं.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!