माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा पीक घेतलं जातं कमी कालावधीत जास्त पैसे देणार पीक हे कांदा पीक म्हणून ओळखले जात . जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात क्षेत्र कांद्यासाठी वापरलं जातं.
पण चांगला भाव मिळाला नाही तर घोर निराशा बघायला मिळते.दर अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल शुक्रवारी कांद्याच्या 6471 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल
कांद्याला जास्तीत जास्त 1800 रुपये इतका भाव मिळाला आहे.राहाता बाजार समितीत 6 हजार 471 कांदा गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1400 ते 1800 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 750 ते 1350 रुपये,
कांदा नंबर 3 ला उन्हाळी 400 ते 700 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 900 ते 1100 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 400 रुपये भाव मिळाला.
तर डाळिंबाच्या 1393 क्रेट्सची आवक झाली. डाळिंबाला नंबर 1 ला प्रति किलोला कमीत कमी 71 रुपये, तर जास्तीत जास्त 115, डाळिंब नंबर 2 ला 46 ते 70 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 26 ते 45 रुपये,
डाळिंब नंबर 4 ला 10 ते 25 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.