माय महाराष्ट्र न्यूज:घराकडे जात असलेल्या 21 वर्षीय विवाहित तरूणीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील माहेगाव येथे दि.10 मार्च रोजी घडली.
राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील एक 21 वर्षीय विवाहित तरूणी दि. 10 मार्च रोजी सहा वाजे दरम्यान बाथरूमला गेली होती. ती घराकडे परत येत असताना आरोपी तिच्या पाठीमागून आला आणि मिठी मारत.
त्याने तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करु लागला. तेव्हा त्या तरूणीने जोरात आरडाओरड केली. तेव्हा तिचा पती तेथे पळत आला. त्याला येत असल्याचे पाहून आरोपीने त्या तरूणीला खाली
पाडून तिच्या अंगावर पाय देऊन तेथून पळून गेला. घटनेनंतर त्या तरूणीने राहुरी पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.तिच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन चव्हाण, रा. शेनवडगाव, ता. राहुरी
याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक महेश भवार हे करीत आहेत.