Tuesday, May 24, 2022

अत्यंत महत्त्वाचे :राज्य बदलल्यास वाहन क्रमांक बदलण्याची आवश्यकता नाही कारण आता ही सुविधा आली

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्य बदलल्यानंतर पुन्हा वाहन नोंदणीची समस्या. भारत सरकारने अखेर ही समस्या सोडवली आहे. आता बीएच सीरीज नंबर प्लेट आणि नोंदणी सुरू झाली आहे.

त्यामुळे आता राज्य बदलल्यास वाहन क्रमांक बदलण्याची आवश्यकता भासणार नाही.रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ही मालिका अशा लोकांसाठी सुरू केली आहे, ज्यांची नोकरीनिमित्ताने वेगवेगळ्या

राज्यांमध्ये बदली होते. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना विशेषत: संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना यामध्ये विशेष प्राधान्य दिले गेलं आहे.आजच्या काळात कामामुळे लोकांना अनेकदा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जावे लागते.

अशा परिस्थितीत,नवीन राज्यात पोहोचल्यावर, आपल्या वाहनाची नवीन नोंदणी करणे खूप डोकेदुखी आहे. आता या त्रासातून लोकांना दिलासा मिळाला आहे.या नवीन सीरिजमध्ये 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या वाहनांवर 8 टक्के शुल्क भरून बीएच

सीरिजचा क्रमांक मिळवता येईल. जर वाहनाची किंमत 10 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत असेल तर या सीरिजवरवर 10 टक्के दराने शुल्क आकारलं जाईल. बीएच सीरीजसाठी, वाहनाची किंमत 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास 12 टक्के शुल्क भरावे लागेल.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांशिवाय खासगी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचे कर्मचारीही या BH-Series चा लाभ घेऊ शकतील. 4 किंवा अधिक राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालये असलेल्या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचे कर्मचारी याचा लाभ घेऊ शकतात.

या मालिकेचा फॉरमॅट अशा प्रकारे असेल, नंबर प्लेटवर पहिले वर्ष लिहिलं जाईल. यानंतर भारत म्हणून BH लिहिलं असेल आणि त्यानंतर वाहन क्रमांक असेल.BH नंबर प्लेट नेहमीच्या नंबर प्लेट सारखीच आहे. पांढऱ्या पट्टीवर काळी अक्षरं आहेत.

पण आताच्या नंबर प्लेटच्या नेमकी उलट ही नंबर प्लेट आहे. म्हणजे ज्या वर्षात तुम्ही वाहन घ्याल ते वर्ष (उदा. आताचं वर्ष 22), त्यानंतर ‘BH’ म्हणजे भारत, त्यानतंर वाहन क्रमांक आणि ‘A’ म्हणजे वाहन श्रेणी. उदा. 22 BH 0756 A (वर्ष, भारत, वाहन क्रमांक, श्रेणी)

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!