माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात येऊन आता जवळपास अडीच वर्ष उलटलं आहे. तरीदेखील विरोधकांकडून सातत्याने सरकार पडणार असल्याचे दावे केले जात आहेत.
मात्र, दुसरीकडे अडीच वर्ष उलटल्यानंतर देखील २०१९मध्ये सत्तास्थापनेवेळी महाराष्ट्रात झालेलं महानाट्य कुणीही विसरलेलं नाही. २०१९च्या ऑक्टोबर महिन्यात खूप साऱ्या घडामोडी घडत होत्या. त्यावेळचा एक किस्सा नुकताच नगरचे पालकमंत्री तथा राज्याचे
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका कार्यक्रमात सांगितला आहे. बाहेर बघितलं तर पाऊस आणि टीव्ही लावला की संजय राऊत, असं समीकरण झालं होतं”, असं हसन मुश्रीफ म्हणाले आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.
ऑक्टोबर २०१९मध्ये फार मोठा पाऊस पडत होता. आम्ही काही मुंबईला गेलो नव्हतो. कारण कळालं होतं की आपण विरोधी पक्षात बसणार आहोत. पण तेव्हा बाहेर बघितलं की पाऊस आणि टीव्ही लावला की संजय राऊत असं समीकरण झालं होतं”, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी मिश्किल टिप्पणी केली.
इस्लामपूर मधील पंचायत समितीतील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळयाचं अनावरण हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना हसन मुश्रीफ यांनी आपल्याला २०१९च्या निवडणुकांनंतर वाटलंच नव्हतं की पुन्हा सत्ता येईल, असं म्हटलं आहे.
२०१९ साली विधानसभा निवडणुका झाल्या. भाजपाचे १०५ आणि शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले. त्यांची निवडणूक पूर्व युती होती. आपल्याला वाटलंच नव्हतं की पुन्हा आपली सत्ता येईल. पुन्हा एकदा
पाच वर्ष विरोधी पक्षात बसावं लागेल, अशीच आपली धारणा होती. पण नीतीला हे मान्य नव्हतं असं मुश्रीफ म्हणाले.