माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक आगळे पाटील यांच्या पुढाकारातून आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे देशातील सर्वात 101फुटाचे उंच भव्य दिव्य असे शिवस्मारक लवकरच नेवासा फाटा परीसरात उभारण्यात येणार आहे.
असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दौलत गणगे पाटील यांनी सांगितले.हे भव्य दिव्य शिवस्मारक येणाऱ्या नविन पिढीला प्रेरणा व आदर्श निर्माण करणारे आसनार आहे.त्यामुळे दिपक आगळे
पाटील यांनी राज्यातील सर्व गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात यावे असे आवाहनही केले आहे. शेवगाव तालुक्यातील देवी निमगांव व नेवासा तालुक्यातील शहापूर येथे शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात आले आहेत.
या गावांचा आदर्श देखील ईतर गांवानी घेतला पाहिजे.दिपक आगळे पाटील हे राज्य सरकार यांच्या कडे निधी साठी पाठपुरावा चालू असुन लवकरच छत्रपती शिवाजीराजांचे स्मारक उभारण्यात येणार आहे असे उदगार दौलत गणगे पाटील यांनी काढले
या स्मारकाच्या उभारणीसाठी दिपक आगळे पाटील यांच्या पुढाकारातून जय श्रीराम ग्रुप चे प्रमुख श्री.संतोष काळे, .खामगावचे सरपंच श्री.केदार आगळे,वरखेडचे सरपंच श्री. विनोद ढोकणे,मा.सरपंच श्री.अशोक देवढे,पत्रकार. श्री.सचिन दसपुते,पत्रकार श्री. बाळासाहेब जाधव,श्री.अशोक टेकणे,
श्री.अभिषेक पटारे,श्री.दैलत गणगे,श्री.शरद जाधव,श्री.विकास उभेदळ,श्री ज्ञानेश्वर पेचे,पिपरीशहालीचे सरपंच . श्री सचिन नवथर, सरपंच.श्री अजय साबळे,श्री.आदिनाथ पटारे,आॅड श्री.संभाजी पवार,श्री.राजेंद्र मते,
श्री लक्ष्मण मोहिटे,श्री डाॅ प्रकार पवार,श्री गणेश वाळुजकर,श्री.राजकुमार मुंडे ,मा सरपंच श्री कानिफनाथ सावंत ,श्री.श्रीकृष्ण मुरकुटे,श्री सचिन कडु पाटील याच्या पुढाकारातून शिव स्मारक समिती स्थापन करण्यात आली असून लवकरात लवकर स्मारकाचं काम चालू होईल.
आपल्या देशाचा अभिमान व आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे भविष्यात व युवा पिढीला प्रेरणा मिळावी तसेच छत्रपती यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्याच धर्तीवर आज देशात छत्रपती
यांचे स्मारक उभारुन व आदर्श घेऊन देशात हिंदवी राष्ट्र घडविण्यासाठी छत्रपती यांचे भव्य दिव्य शिवस्मारक ग्रामीण भागात होणं गरजेचचं.
श्री दिपक आगळे पाटील:अध्यक्ष. महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशन.