माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रात थंड आणि उष्ण हवामानाचा खेळ सुरु झाला आहे. दरम्यान, फेब्रुवार महिन्याच्या मध्यापासून राज्यासह देशात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा
भारतीयह हवामान खात्याने दिला होता. यानुसार राज्यातील कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या प्रदेशात अवकाळी पावसाचा शिडकाव झाला आहे.दरम्यान, आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने ट्विट करत
राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यानुसार महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट उद्यापर्यंत राहणार
असून पालघर जिल्ह्यातील काही भागातही उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मागील काही दिवसांपासून कोकण, उत्तर महाराष्ट्र, पुणे या जिल्ह्यातील काही भागांत पाऊस पडला आहे. ऐन हंगामात पाऊस झाल्याने शेतीचे काही
प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी आता कोकणातील वायंगणी शेतीही संकटात आली आहे. अवकाळी पावसाचे सावट असल्याने बळीराजा चिंतातुर झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. काजू, आंबा, कोकम अशा उन्हाळा हंगामातील
शेतीवर याचा परिणाम होऊ शकतो. राज्यातील काही ठिकाणी दिवस ढगाळ वातावरणामुळे उष्णता निर्माण झाली आहे. हीच लाट राज्यात काही काळ तशीच राहु शकते अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.