नेवासा
भेंडा येथील श्री संत नागेबाबा संस्थेच्या कर्जदारांसाठी घेण्यात आलेल्या कर्ज संरक्षण विमा योजनेमुळे देवगाव येथील दोन खातेदारांना कर्जमुक्ति मिळाली आहे.
श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट व पतसंस्थेच्या माध्यमातून ग्राहकांना ३६५ दिवस सेवा देताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा प्रत्येक सभासद आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या, सक्षम झाला पाहिजे यासाठी संस्था सतत प्रयत्नशील असते.श्रीसंत नागेबाबा पतसंस्थे च्या भेंडा शाखेचे महिला बचत गटातील नेवासा तालुक्यातील देवगाव येथील
कर्जदार महिला रुक्मिणी प्रकाश कपिले यांना ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत १ लाख रूपयांचे तर त्यांचे पती पतसंस्थे अंतर्गत प्रकाश बाबूराव कपीले
यांना पतसंस्थे अंतर्गत ५० हजार रूपयांचे तातडी कर्ज दिले होते. ग्रामीण विकास योजना अंतर्गत कर्ज देताना कर्जदार आणि घरातील (पती किंवा पत्नी) दोघांचा ही संस्थे मार्फ़त कर्ज संरक्षण विमा घेतला जातो. कर्जदार प्रकाश कपिले यांचे ३० एप्रिल २०२३ रोजी अपघाती निधन झाल्याने विमा कंपनीकडून मिळालेल्या रकमेत त्यांचे उर्वरित कर्ज पूर्ण झाल्याने त्यांचे व त्यांच्या पत्नी रुक्मिणी प्रकाश कपिले यांची कर्जमुक्ति झाली आहे.
सदर कर्ज मुक्तिचा दाखला रुक्मिणी प्रकाश कपिले यांना देण्यात आला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, विष्णू गायकवाड, तंटामुक्तीचे अध्यक्ष कचरदास गुंदेचा, गणपतराव आगळे, खानसाहेब पठाण, सर्जेराव मुरकुटे, उपसरपंच बाबासाहेब वाल्हेकर, रामभाऊ तागड, सुखदेव निकम, उत्तम काळे, पप्पु पठाण, निजामभाई शेख, अजित रसाळ, सुभाष चौधरी, राजेंद्र चिंधे, अवधूत लोहकरे, पतसंस्थेचे विकास अधिकारी कन्हैय्या काळे, नागेबाबा पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक दिलदार शेख, नागेबाबा मल्टिस्टेटचे शाखा व्यवस्थापक संतोष साप्ते, सिरोद्दीन सय्यद, रविंद्र व्यवहारे, लक्ष्मण थोरात, किरण डुकरे, सागर इटकर आदी उपस्थित होते.
यावेळी अजित रसाळ, राजेंद्र चिंधे, अवधुत लोहकरे, कचरदास गुंदेचा, विष्णू गायकवाड,अजित मुरकुटे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचन संतोष साप्ते यांनी केले.
दिलदार शेख यांनी आभार मानले.