माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेअंतर्गत खासदार सुजय विखे पाटील यांनी शनिवारी पारनेर तालुक्यातील हजारो लाभार्थ्यांना अनेक साहित्याचे वाटप केले असून या कार्यक्रमाला भाजपाच्या
जिल्हा व तालुका पदाधिकारांना डावलले असून आम्हाला विश्वासात न घेता हा कार्यक्रम पारनेर मध्ये घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कार्यक्रमा दरम्यान भाजपच्या आजी-माजी पदाधिकारी यांना डावलून खासदार सुजय विखे
यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्यांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम केला. त्यामुळे खासदार विखे जर तालुक्यामध्ये शिवसेना व काँग्रेसच्या पदाधिकार्यांना बरोबर घेऊन सोयीचे राजकारण करत असेल तर आमची इतर पक्षाबरोबर दुश्मनी
नाही, असे म्हणत भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे व भाजपचे तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे यांच्यासह जवळपास २० भाजप पदाधिकार्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
तर दुसरीकडे विकास कामे करतानाही खासदार सुजय विखे आम्हाला विश्वासात घेत नसून आम्ही गावोगावी लोकांना काय उत्तर द्यायची, असा सवाल करत भाजपच्या पदाधिकार्यांनी कधीतरी खासदार सुजय विखे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे.
यासंबंधी निवेदनाची प्रत संघटन मंत्री रावजी अनासपुरे व जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांना देण्यात आली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, पारनेर तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्तेच्या माध्यमातुन पक्ष संघटनेसंदर्भात काही गोष्टी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की,
भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे स्थानिक भाजपाच्या कार्यकत्यांना विश्वसात घेतच नाहीत. पक्ष संघटना बळकट करण्यासंदर्भात कुठलीही मदत करत नाही. भाषणात फक्त आश्वासने देतात प्रत्यक्षात मात्र पारनेर तालुक्यातील शिवसेनेला
सर्व प्रकारची मदत चालु असते. गेली तीन वर्षामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना खासदार निधीतला एक छदामही मिळालेला नाही. भाजपच्या कार्यकतचा साधा फोन खासदारांच्या पीए कडून व स्वत:खासदारांकडून स्वीकारला जात नाही. भाजप कार्यकत्यांना
शासकीय कार्यालयात जाणीवपुर्वक अडचणी निर्माण केल्या जातात. कार्यकर्त्यांना अशावेळी कुठलीही मदत खासदारांकडुन केली जात नाही. वरील सर्व मुद्यांच्या समर्थनार्थ अजुन एक उदाहरण देत आहोत ११ मार्च २०२२ रोजी वयोश्री योजनेच्या अनुदानीत साहित्य वाटपाचा कार्यक्रम
खासदार डॉ.विखे यांनी आयोजित केला आहे. परंतु स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता संपुर्ण संयोजन झालेले आहे. त्याचबरोबर तपासणी कार्यक्रमांचे वेळेसही भाजपा कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलेले नव्हते. गेली तीन वर्षे आम्ही सगळे भाजपा कार्यकर्ते हे सहन
करत आहेत. नाईलाजाने हे पत्र देत आहोत या सगळ्यांवर उपाय म्हणुन पारनेर तालुका भाजपच्या बळकटीकरणासाठी पुढील उपाय सुचवितो की, पारनेर तालुका भाजपसाठी प्रदेश शाखेच्या वतीने स्वतंत्र प्रभारी नेमण्यात यावा, असेही पत्रात म्हटले आहे.
खासदार निधीतील पारनेर तालुक्यात येणा-या निधीपैकी ५० टक्के निधी स्थानिक भाजप च्या कार्यकत्यांना विचारून वितरीत करावा. वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय व इतर समित्या नियुक्त करताना भाजप कार्यकत्यांना विश्वासात घेऊनच कराव्यात. सर्व केंद्र शासनाच्या
संदर्भातील कार्यक्रमांमध्ये (विचारतच घेतले जात नाही) उद्घाटन प्रक्रियेत स्थानिक पदाधिका-यांची नावे समाविष्ट करण्यात यावीत. या सर्व उपाय योजनांची अंमलबजावणी व्हावी अशी विनंती सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कडे करण्यात आली आहे.