Wednesday, May 25, 2022

निलेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेलं पिल्लू

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा राजकीय संघर्ष वाढत असताना दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर आक्रमक टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री

गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांच्यावर खरमरीत शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे.’निलेश राणे कोण आहेत? हे निलेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेलं पिल्लू आहे.

ते काय आम्हाला शिकवणार?’ अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी राणे यांचा खरपूस समाचार घेतला आहे.रत्नागिरी येथील कार्यक्रमात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सर्वांना पुरून उरतील

असे अनेक ठाकरे आणि पवार ते खिशात घेऊन फिरतात, असं वक्तव्य निलेश राणे यांनी केलं होतं. या वक्तव्याचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात

आल्याने त्या निषेधार्थ राज्यभरात भाजप आंदोलन करत आहे. याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘आंदोलन करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. फडणवीस यांच्यासोबत काही चुकीचं झालं असेल असं भाजप कार्यकर्त्यांना

वाटत असेल म्हणून ते आंदोलन करत आहेत. आंदोलन करणं चुकीचं नाही, मात्र या आंदोलनाचा नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये, रुग्णवाहिका असो की प्रवासी वाहने रोखून नागरिकांना वेठीस धरू नये,’ असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!