Monday, May 23, 2022

मंत्री गडाखांची भेट घेतली या मनसेच्या दिग्गज नेत्यांने ;खा विखेंची ही भेट :नगर जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात नियोजित मेळाव्यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर शनिवारीच नगरला आले होते. त्यांनी शनिशिंगणापूर येथे जाऊन शनीचे दर्शन घेतले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा परिषद व पंचायत समितीनिवडणुकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्याच अनुषंगाने मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी रविवारी नगरमध्ये पक्षाचा मेळावा घेतला.

मात्र, मेळाव्यापूर्वी त्यांनी भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिवसेनेचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचीही भेट घेतल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांनी शनिशिंगणापूर येथे जाऊन शनीचे दर्शन घेतले. त्यानंतर गडाख आणि विखेंचीही भेट झाली.

काही प्रश्नांसंबंधी नांदगावकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. त्यानंतर झालेल्या मेळाव्यात मनसेची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी कार्यकर्त्यांना काचपिचक्याही दिल्या. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना तयार राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

नांदगावकर म्हणाले, ‘नगर जिल्ह्यात मनसेला मोठा वाव आहे. कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्यास आपल्याला नक्कीच यश मिळेल. जुन्या कार्यकर्त्यांना सोबत ठेवून आणि नव्यांना जोडत पक्ष वाढवा. महिलांना पक्षात

सामावून घ्या. समाजातील सर्व गरजू घटकाला मदत करा. अन्याय-अत्याचाराला विरोध करत लढा द्या. कोणताही पक्ष संघर्ष केल्याशिवाय उभा राहत नाही. आंदोलन हाच पक्षाचा आत्मा तर सामान्य कार्यकर्ता ही पक्षाची शक्ती असते. मनसे कार्यकर्ते जीवाचे रान करतात

तरीही आपण मागे पडतो, कारण आपल्या पदाधिकाऱ्यांचे हातात हात नाहीत. कोणीही परस्पर निर्णय घेतो. यापुढे असे चालणार नाही. पदाधिकारी बदलाचे अधिकार फक्त पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे आहेत,’ असंही नांदगावकर म्हणाले.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!