माय महाराष्ट्र न्यूज:शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सेवकाच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पीडित आरोग्य सेवकाने ढोकी पोलिस स्टेशनमध्ये रितसर तक्रार नोंदवली आहे. मात्र, अद्याप पोलिसांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही, असा आरोप
पीडित कुटुंबाने केला आहे. उस्मानाबाद तालुक्यात ही घटना घडली आहे.स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशन लोमटे यांच्यांवर आरोप करण्यात आला आहे.
वैद्यकीय अधिकारी पीडित आरोग्य सेवकाकडून कार्यालयीन कामकाजासोबत त्यांची खासगी कामे देखील करून घेत होते. हात-पाय दाबून घेणे, तेलाने मालिश करून घेणे आदी कामे तर नित्याची झाली होती. इतकेच नाही तर वैद्यकीय अधिकाऱ्याने
आरोग्य सेवकाच्या पत्नीला फोन करून शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडित आरोग्य सेवकाने पोलिस तक्रारीत तसा उल्लेख देखील केलेला आहे.पीडित आरोग्य सेवकाने
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, कोंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशन लोमटे यांनी पीडित आरोग्य सेवकाच्या पत्नीला फोन करून तिला शरीरसुखाची मागणी केली. ‘तू माझ्यावर प्रेम कर, तू माझ्या घरी
राहायला ये. तुला शेताची मालकीण बनवतो, असे देखील म्हटले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याने आरोग्य सेवकाच्या पत्नीला अनेकदा फोन करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. या त्रासाला कंटाळून तिने पतीला सगळा प्रकार सांगितला. याप्रकरणी
पीडित आरोग्य सेवकाने ढोकी पोलिस स्टेशनमध्ये 12 मार्च रोजी वैद्यकीय आरोग्य अधिकार डॉ. किशन लोमटे यांच्या विरोधात रितसर तक्रार नोंदवली. परंतु, अद्याप पोलिसांनी तक्रारीवर अद्याप कार्यवाही केली नसल्याचे पीडित कुटुंबीयांचं म्हणणे आहे.