माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने काही जिल्ह्यांना झोडपून काढले. राज्यात अनेक भागात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. ऐन हाती आलेले पीक वाया गेले आहे.
नाशिक जिल्ह्यात ऐन द्राक्षांची तोडणी सुरू असताना पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. आता मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी
पुढील तीन दिवस महत्त्वाचे आहे. या तीन दिवसांत तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट असणार आहे. मुंबईचे कमाल तापमान 39 अंश सेल्सिअसवर पोहोचेल.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण काळजी घ्यावी. कारण, तापमाण हळूहळू कमी होण्याची शक्यता असल्याचे देखील हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. समुद्र किनारपट्टी भागात कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा
4.5 वर व कमाल तापमान किमान 37 डिग्री सेल्सिअस असावे, असे देखीव हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट असणार आहे.
मुंबईचे कमाल तापमान 39 अंश सेल्सिअसवर पोहोचेल.नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण काळजी घ्यावी.