Tuesday, May 17, 2022

धक्कादायक:१० वीच्या परीक्षा पुर्वी संस्थाचालकांची विद्यार्थीकडे केली ही मागणी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून राज्यात माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होत आहे. ही परीक्षा सुरू होण्यापूर्वी औरंगाबाद मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

दहावीच्या विद्यार्थ्याला परीक्षेचं हॉलतिकीट देण्यासाठी संस्थाचालकाने चक्क 30 हजार रुपयांची लाच मागितली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. या प्रकरणी संस्थाचालकासह

एका महिला लिपिकाला अटक करण्यात आली आहे.दहावीच्या परीक्षेचं हॉल तिकीट देण्यासाठी तसेच परीक्षेत मदत करण्याचं सांगत संस्थाचालकाने विद्यार्थ्याकडे 30 हजार रुपयांची लाच मागितली होती. यानंतर

तडजोड होऊन 10 हजार रुपये देण्याचं ठरलं. हे पैसे घेत असतानाच संस्थाचालक आणि महिला लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या संदर्भात लोकसत्ताने वृत्त दिलं आहे.लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार

अटक करण्यात आलेल्या संस्थाचालकाचे नाव संपत पराजी जवळकर असे आहे. तर महिला लिपिकाचे नाव सविता खामगावकर असे आहे. संपत पराजी जवळकर हे सातारा परिसरात असलेल्या पी. डी. जवळकर पब्लिक स्कूलचे संस्थाचालक आहेत.

यंदा दोन वर्षांनंतर बोर्डाची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेची उत्सुकता लागली आहे. वर्षभर ऑनलाईन क्लासेस केल्यानंतर विद्यार्थ्यांना आता ऑफलाईन परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!