Wednesday, May 25, 2022

जलसंधारणाच्या कामांत मोठा गैरव्यवहार;नगर जिल्ह्यातील या आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जिल्हास्तरीय बिगर आदिवासी योजनेअंतर्गत वन विभागामार्फत पारनेर तालुक्यात राबवण्यात आलेल्या मृद व जलसंधारणाच्या कामांमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची

तक्रार आमदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.वन विभागातील गैरव्यवहारासंदर्भात आमदार लंके यांनी यापूर्वीही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे. सुपे येथील वनपरिमंडळ अधिकारी

एस. एस. भोसले यांनी या निधीमध्ये घोटाळा झाल्याची तक्रार आमदार नीलेश लंके यांच्याकडे केली आहे. या तक्रारीवरून आमदार लंके यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत समिती नेमून लाचलुचपत प्रतिबंधक

विभागामार्फत या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी आमदार लंके यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.पारनेर वनक्षेत्रातील गॅबियन बंधारे व माती नालाबांध या कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १ कोटी २२ लाख ४२ हजार ११७ रुपये निधी

जिल्हा उपवनसंरक्षक यांच्याकडे वर्ग केला. या निधीतून ४४०६/३२२१ योजनेअंतर्गत पारनेर वन क्षेत्रातील सुपे, वाळवणे, रूईछत्रपती, पळवे बुद्रुक तसेच इतर गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे करण्यात यावीत, असे आदेश देण्यात आले होते.

मात्र, पारनेर वनक्षेत्राचे वनरक्षक जगताप यांनी ठेकेदारांना कामे वाटप करताना योग्य ती निविदा प्रक्रिया राबवली नाही.बनावट निविदा प्रक्रिया राबवून मर्जीतील ठेकेदारांना कामांचे वाटप करण्यात आले. संबधित ठेकेदारांनी अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे केली.

ठेकेदार व अधिकाऱ्यांनी संगनमताने या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केला असल्याचे आमदार लंके यांनी तक्रारीत म्हटले आहे.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!