Wednesday, May 25, 2022

जबरदस्त:स्पर्श न करता आता ऑपरेट करु शकाल मोबाईल; जाणून घ्या कसे

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जगात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नव्या तंत्रज्ञानांचा शोध लावण्यात येतो आहे. हा व्हायरस तुमच्या मोबाईल फोन, लॅपटॉपसारख्या टच स्क्रीनच्या माध्यमातून फैलावू शकतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी

बंगळुरुच्या शास्त्रज्ञांनी टच फ्री टच सक्रीन डेव्हलप केली आहे. याच्या मदतीने प्रत्येक स्क्रीनला टच न करता ९ सेंटीमीटर अंतरावरुन तुम्ही मोबाईल ऑपरेट करु शकणे शक्य होणार आहे.हा एक सेन्सर आहे, जो स्पर्श न करणारा सेंसर म्हणून ओळखला जातो.

याला सेंटर फॉर नॅनो एन्ड सॉफ्ट मॅटर सायन्स आणि जवाहरलाल नेहरु सेंटर ऑप एडव्हान्स अँड सायन्टिफिक रिसर्च यांच्या शास्त्रज्ञांनी एकत्रितरित्या तयार केले आहे.यासाठी सेमी ऑटोमेटेड प्रोडक्शन प्लांट तयार करण्यात आला आहे.

यासाठी ३०० मायक्रॉन रिझॉल्यूशन असलेल्या प्रिंटेड एडेड पॅटर्नचे प्रोडक्शन करण्यात येणार आहे. हे एका प्रकारचे पारदर्शक इलेक्ट्रोड्स आहेत, ज्यांचा वापर टचलेस स्क्रीनच्या तंत्रात करण्यात येतो.सार्वजनिक ठिकाणीही सेन्सर उपयोगी पडतील.

शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, हे सेन्सर उपयोगी पडणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी सेल्फ सर्व्हिस कियोस्क, एटीएम आणि वेंडिंग मशिन्ससाठी हे उपयोगी ठरण्याची शक्यता आहे. यामुळे कोणत्याही स्क्रीनशी तुमचा व्यक्तिगत संपर्क येणार नाही.

त्यामुळे कोरोनाचे विषाणूंचे संक्रमण थांबवण्यात मदत होईल.९ सेंटीमीटर अंतरावरुन न स्पर्श करता सेंसरद्वारे काम करता येणार आहे. त्यामुळे कोणत्याही डिव्हाईसला प्रत्यक्ष स्पर्श करण्याची गरज राहणार नाही. कोणताही स्पर्श न करता,

यावरुन तुम्ही मोबाईल किंवा एटीएममध्ये काम करु शकणार आहात. आगामी काळात हे तंत्रज्ञान सगळीकडे वापरता येणे सहज शक्य होणार आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!