माय महाराष्ट्र न्यूज:विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या विज बिलाबाबत महत्वाची घोषणा केली. मागच्या कित्येक महिन्यापासून कृषीपंपाच्या विज बिल माफ करण्याबाबत सरकारकडे मागणी करण्यात येत होती.
दरम्यान आज नितीन राऊत यांनी पुढील तीन महिेने कृषी पंपाची विज न तोडण्याचे आवाहन केले आहे. ते आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत होते.राऊत पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हाती पिक येईपर्यंत पुढील तीन महिने
वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार नाही. तसेच ज्यांचे विज बिले थकीत आहेत त्यांनी त्वरित दुरूस्ती करून घेण्याचेही ते म्हणाले. दरम्यान राऊत यांच्या या घोषणेने तुर्तास शेतकऱ्यांनी दिलासा मिळाला आहे.ज्या प्रकारे सावकार आणि सुल्तानी पद्धतीने हे सरकार वागते आहे.
त्या विरोधात आम्ही एल्गार केला. आमची मागणी एकच आहे. स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी मागच्या अधिवेशनात स्पष्टपणे घोषणा केली होती की, मे पर्यंत कोणत्याही शेतकऱ्याची वीज कापली जाणार नाही.
मग अधिवेशनात दिलेलं आश्वासन पूर्ण का होत नाही, का ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीनं वागतंय, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवरुन विरोधकांनी गोंधळ घातल्यानंतर विधीमंडळाचे कामकाज तूर्तास स्थगित झाले होते. पाच ते दहा
मिनिटांच्या विश्रांतीनंतर कामकाज पुन्हा सुरु झाले. यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ही मोठी घोषणा केली. ते म्हणाले, ‘तूर्तास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.