माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात भिंगार परिसरात पतीने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात लोखंडी वॉल मारून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात
आला असून आरोपी पतीला कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे.गंगाधर नवनाथ लोंढे (वय ५७, रा. प्लॉट नं. १२, गणपती मंदिराजवळ, जामखेड रोड, ता. जि. अहमदनगर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.
मंदा सुनील वैराळ असे मयत महिलेचे नाव आहे.मंदा वैराळ यांचा पती आरोपी सुनील हिरामण वैराळ याला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली असून त्याला मंगळवारी दुपारी उशिरा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
फिर्यादी गंगाधर लोंढे यांच्या घराच्या वरील मजल्यावर आरोपीसुनील वैराळ आणि मयत मंदा वैराळ त्यांच्या दोन मुली आणि एका मुलासह भाडेकरू म्हणून वास्तव्यास होते. सोमवारी रात्री सव्वाअकराच्या दरम्यान आरोपी
सुनील वैराळ याने घरगुती वादाच्या कारणातून मंदा वैराळ यांच्या डोक्यात पाईपलाईनचालोखंडी वॉल मारून खून केला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी आरोपी सुनील वैराळ याला अटक केली आहे.कॅम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख या प्रकरणाचा तपास करत आहेत.