माय महाराष्ट्र न्यूज:वीज बिलाच्या थकबाकीमुळे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात एका शेतकऱ्याने थेट वीज रोहित्रावर चढून शोले टाइप आंदोलन केले. डीपी वरचढून वीज वाहक तारा हातात
घेऊन हा शेतकरी बसून राहिला. वीज पुरवठा बंद असल्याने त्याचा जीव वाचला. यासंबंधी आंदोलने करूनही वीज कंपनी आणि सरकारला जाग येत नसेल तर हातात काठ्या, कुऱ्हाडी घेण्याची वेळ आली आहे, असा इशारा
स्वाभिमानी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.जामखेड तालुक्यातील खुरदैठण येथील लक्ष्मण भिकाजी कदम या शेतकऱ्याने हे आंदोलन केले. गावातील पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी समजूत काढून त्यांना सुरक्षितपणे खाली घेतले. गेल्या
काही दिवसांपासून महावितरण कंपनीने थकबाकीपोटी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे.खुरदैठन परीसरातील शेतकर्यांचेही वीज बील थकल्यामुळे विद्युतरोहित्र (डीपी) बंद केली आहेत. खुरदैठन येथील लक्ष्मण भिकाजी कदम यांनी
आपल्या शेतात ऊस लावला आहे. पाणीटंचाईमुळे जळून जात आहे. त्यातच कदम यांच्या शेताजवळील कदम वस्ती येथील विद्युत रोहीत्र वीजबील थकल्यामुळे दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना शेताला पाणी देता येत नाही.
यामुळे संतप्त झालेल्या कदम यांनी येथील विद्युत रोहित्रावर चढत चक्क वीज तारा हतात घेतला. वीज कनेक्शन पूर्ववत करा, अन्यथा आत्महत्या करतो, असा इशारा त्यांनी दिला. मात्र, त्यावेळी
मेन लाइनमधील वीज पुरवठा खंडित झालेला होतो. त्यामुळे त्यांना काहीही झाले नाही.