Monday, May 23, 2022

IPL 2022 साठी नियमांमध्ये महत्वाचे बदल; जाणून घ्या

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आयपीएलच्या आगामी हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होते आहे. कोविडमुळे यंदाची आयपीएल ही मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये खेळवली जाणार आहे.

चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातीलसामन्याने यंदाच्या हंगामाला सुरुवात होईल. या हंगामाला सुरुवात होण्याआधी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सील आणि बीसीसीआयने

नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत.DRS, प्ले-ऑफ किंवा फायनल च्या सामन्यात सुपरओव्हर आणि अन्य काही महत्वाचे बदल बीसीसीआयने आगामी हंगामासाठी केलेले आहेत.

नियम पहिला – एखाद्या सामन्याआधी एका संघातील खेळाडूंना जर कोरोनाची लागण झाल्याचं समजलं आणि जर त्या संघात १२ खेळाडूंपेक्षा कमी खेळाडू प्लेइंग ११ च्या कॉम्बिनेशनसाठी उपलब्ध असतील तर बीसीसीआय तो सामना पुन्हा एकदा आयोजित करेल.

जर हे देखील शक्य झालं नाही तर हे प्रकरण आयपीएलच्या तांत्रिक समितीकडे सोपवलं जाईल. तांत्रिक समितीने दिलेला निर्णय अंतिम आणि सर्वांना मान्य करावा लागेल.

याआधीच्या नियमाप्रमाणे जर एखाद्या सामन्याआधी संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाली तर बीसीसीआय तो सामना नंतर आयोजित करायचं. जर हे देखील शक्य झालं नाही तर प्रतिस्पर्धी संघाला दोन पॉईंट दिले जायचे.

दुसरा नियम – प्रत्येक इनिंगमध्ये आता संघांना दोन DRS च्या संधी मिळणार आहे.

तिसरा नियम – काही दिवसांपूर्वी MCC ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल केले होते. त्यातीलच एका नियमाची अंमलबजावणी बीसीसीआय यंदाच्या आयपीएलमध्ये करणार आहे.

ज्यात एखादा खेळाडू कॅचआऊट होत असताना जरीही त्याने क्रिज अर्ध्यावर ओलांडली असली तरीही त्यानंतर येणारा नवीन खेळाडू स्ट्राईक एंडला उतरेल.

चौथा नियम – जर प्ले-ऑफ आणि अंतिम सामन्यात सुपरओव्हरमध्ये सामन्याचा निकाल लागला नाही तर जो संघ साखळी फेरीत सर्वोच्च स्थानी असेल त्याला विजेता म्हणून घोषित केलं जाईल.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!