Tuesday, May 17, 2022

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना भावानेच केला भावाचा खून

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिल मयत झाल्यानंतर आईला कोणी संभाळायचे? या कारणाहुन दोन

भावांत वाद सुरु होते. यातील एकाने आठ महिन्यापुर्वी आईच्या गळ्यातील लक्ष्मीहार एका ठिकाणी गहाण ठेवला होता. त्याबाबत त्याला टोकले असता त्याने थेट आपल्या भावावर कुर्‍हाडीने वार केले. एकदा

नव्हे तर दोनदा हल्ला झाल्यानंतर भाऊ रक्तभंबाळ झाला आणि अखेर त्याने जीव सोडला. अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे ही घटना घडली.रविंद्र मनोहर आरोटे (वय 51) यांचा मृत्यु झाला आहे. त्यानंतर त्यांच्या पत्नीने थेट अकोले

पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांना घटना कथन केली.त्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर मार्तंड मनोहर आरोटे, मयुर मार्तंड आरोटे, शकुंतला मार्तंण्ड आरोटे, सोनल मयुर आरोटे (सर्व रा. ब्राम्हणवाडा, ता. अकोले) या चौघांना आरोपी करण्यात आले आहे.

तुझ्या भावाने माझा सोन्याचा लक्ष्मीहार कोठेतरी गहाण ठेवला आहे. त्यावर रविंद्र म्हणाले की, देताना तु मला विचारले होते का? तो फुकट्याच आहे. तो कसला परत देतो आता. हे शब्द मार्तंण्ड याने ऐकले असता

तो धावत धावत पुढे आला आणि त्याच्या हातातील कुर्‍हाड आपल्या भावाच्या डोक्यात घातली.जेव्हा रविंद्र हे जमिनीवर कोसळले तेव्हा यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर रविंद्र यांच्या पत्नीने मोठ्या धिराने आपल्या नातेवाईकांना फोन केला.

तेव्हा एक व्यक्ती तत्काळ आला असता त्यांनी रविंद्र यांना त्यांच्या रिक्षात टाकून ब्राम्हणवाडा येथील सरकारी दवाखान्यात आणले मात्र, त्यांची प्रकृती प्रचंड गंभीर असल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णवाहीकेतून आळेफाटा येथे हलविण्यात आले.

तोपर्यंत ते बेशुद्ध पडले होते. रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्या डोक्याचे सिटीस्कॅन करुन उपचार सुरू केले मात्र फार उशीर झाला होता. अंतर्गत रक्तस्त्राव आणि मेंदुला लागलेला मार यामुळे ते स्वत:ला सावरु शकले नाही. त्यांनी त्याच दिवशी रात्री एक वाजेच्या सुमारास जीव सोडला.

त्यानंतर पत्नी ललीता रविंद्र आरोटे (रा. खंडोबाची वाडी, रा. ब्राम्हणवाडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात उपरोक्त व्यक्तींवर कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...
error: Content is protected !!