Tuesday, May 17, 2022

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी! दुधाच्या खरेदी दरात ३ रुपये तर विक्री दरात….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पशुखाद्य, इंधन दरात झालेली वाढ यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांना दूध व्यवसाय करणे अडचणीचे झाले आहे.दूध पावडर व बटर यांचे वाढलेले दर त्यामुळे दूधाची

वाढती मागणी व कमी उत्पादन लक्षात घेता दुधाच्या खरेदी दरात ३ रुपये तर विक्री दरात २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कात्रज डेअरी येथे दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या

झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत चर्चा होऊन दूध खरेदी दरात वाढ झाल्याने दूध विक्रीदर वाढविणे क्रमप्राप्त झाल्याने विक्री दरात देखील वाढ करण्याचा विचार झाला.

मात्र, ग्राहकांवरील दरवाढीचा बोजा कमी व्हावा या हेतूने विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करुन विक्री कमिशन कमी करुन तसेच खर्चात बचत करुन एक रुपयाचा बोजा डेअरी व्याववसायिकांनी सोसावा असा निर्णय घेण्यात आला आहे.

कात्रज डेअरीचे कार्यकारी संचालक विवेक क्षीरसागर यांनी दिली. दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महानंद, चितळे, गोवर्धन, गोविंद,

ऊर्जा, शिवामृत, कात्रज, राजहंस, स्फुर्ती, सोनाई, शिवप्रसाद, नेचर डिलाईट, रिअल डेअरी, एस. आर. थोरात, अनंत, संतकृपा, सुयोग इत्यादी सहकारी व खाजगी दूधव्यावसायिकांचे ४७ प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी गोपाळराव

म्हस्के यांची पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, रणजित देशमुख यांची संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्षपदी निवड झाल्याद्दल तसेच संजीवराजे निंबाळकर यांची श्रीमंत मालोजीराजे

सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कल्याणकारी संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!